ऐतिहासिक- या पठ्ठ्याने देशाने खेळलेल्या प्रत्येक कसोटी आणि वनडेत घेतलाय भाग

बेलफास्ट | आज अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात ३ वनडे सामन्यांतील दुसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात झाली. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा हा १००वा वनडे सामना आहे.

या १०० पैकी १०० सामन्यात मोहम्मद नाबी या खेळाडूने भाग घेतला आहे. संघाने जेव्हापासून वनडे खेळायला सुरुवात केली तेव्हापासून त्याने सर्व सामने खेळले आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू आहे.

तर वैयक्तिक पदार्पण केल्यानंतर सलग १०० सामने खेळणारा जगातील दुसरा खेळाडू आहे. यापुर्वी अॅंडी फ्लाॅवर हा झिंबाब्वेकडून स्वत:च्या पदार्पणापासून सलग १७२ सामने खेळला होता.

यापुर्वी स्टीव टिकोला हा केनियाचा खेळाडू संघाने खेळलेल्या पहिल्या ४९ सामन्यातील सर्व सामन्यात खेळला होता परंतु पुढे त्याला संघातून वगळण्यात आले.

अफगाणिस्तान संघ आजपर्यंत १ कसोटी, १००वनडे आणि ६८ टी२० सामने खेळला आहेत. यातील केवळ ३ टी२० सामन्यात नाबीला खेळता आले नाही. बाकी सर्व वनडे आणि कसोटी सामन्यात त्याने भाग घेतला आहे.

नाबीने कसोटीत १ विकेट आणि २४ धावा, वनडेत २२८८ धावा आणि १०५ विकेट्स तर टी२०मध्ये १०१४ धावा आणि ६७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

 …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी