‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त

अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबी सध्या सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील कसोटी सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबद्दल अफगाणिस्तानचे व्यवस्थापक नाझिम जार अब्दुररहिमझाई यांनी माहिती दिली आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार नाझिम जार म्हणाले, ‘हो, नबी सध्या चालू असलेल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेणार आहे.’ असे असले तरी अजून नबीने याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.

त्याचबरोबर तो कसोटीतून निवृत्तीचा निर्णय मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेत असल्याची शक्यता आहे.

सध्या बांगलादेश विरुद्ध सुरु असलेला कसोटी सामना हा नबीचा कसोटी कारकिर्दीतील तिसराच सामना आहे. या सामन्यात त्याला पहिल्या डावात खास काही करता आलेले नाही. तो शून्य धावेवर बाद झाला.

त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 3 कसोटीतील 5 डावात फलंदाजी करताना 25 धावाच केल्या आहेत. तसेच 4 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार शतकी खेळीबरोबर स्टिव्ह स्मिथने केले हे खास ५ विक्रम

संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक

अफगाणिस्तानला मिळाला कसोटी क्रिकेटमधील पहिला शतकवीर!