मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहान ही काँग्रेस या भारतीय राजकिय पक्षाशी जोडली गेली आहे. मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत जहानने पक्षात प्रवेश केला आहे.

व्यवसायिक मॉडेल आणि चिअर लिडर असणारी जहान यावर्षाच्या सुरूवातीपासूनच पती शमीवर केलेल्या विविध आरोपांमुळे बातम्यांमध्ये झळकत होती.

तसेच जहानने एप्रिल 10ला शमीच्या आणि त्याच्या कुटुंबाविरोधात घरगुती अत्याचाराचा आरोपपत्र कोलकाता अलिपोर कोर्टमध्ये दाखल केले होते. तसेच ती पोटगी मिळावी यासाठीही झगडत होती. मात्र शमीने या सगळ्या आरोपांना नाकारले होते.

नुकत्यात झालेल्या विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शमीने दोन विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

कॅच तर रोहित शर्माने अप्रतिम घेतला परंतु या कारणामुळे झाला मोठा वाद

कसोटीपाठोपाठ पृथ्वी शाॅची वनडेतही धमाकेदार खेळी, चौकार- षटकारांची बरसात

दिग्गज खेळाडू म्हणतो, स्मिथ आणि वॉर्नरची ऑस्ट्रेलिया संघाला नितांत गरज आहे