भारताचा माजी कर्णधार म्हणतो, ‘…तर धोनी अजूनही खेळू शकतो क्रिकेट’

2019 विश्वचषक संपल्यानंतर आता भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुुरु आहेत. याबद्दल अनेकांनी विविध मते मांडली आहेत. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी धोनी जर फिट असेल आणि चांगला खेळत असेल तर तो अजूनही खेळू शकतो, असे म्हटले आहे.

अझरुद्दीन पीटीआयला म्हणाले, ‘एखाद्या खेळाडूला खेळायचे असते, पण निवड समीतीला त्याच्याशी बोलायला हवे, तो किती काळ खेळणार आहे, तो कसा खेळणार आहे, पुढे काय होईल.’

‘मोठ्या खेळाडूंच्या बाबातीत, या खेळाडूंना विश्वासात घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी बोलले पाहिजे. मला वाटते त्यामुळे काही निर्णय येऊ शकतो. नाहीतर लोक लिहित राहणार की त्याने निवृत्ती घ्यायला पाहिजे. कारण धोनीकडून काहीही स्पष्टीकरण आलेले नाही.’

भारताचे 3 विश्वचषकात नेतृत्त्व केलेला अझरुद्दीन म्हणाला, ‘माझ्या मते जर तो(धोनी) फिट असेल आणि चांगला खेळत असेल तर तो खेळू शकतो. काहीवेळेस काय होते की खूप क्रिकेट खेळल्यानंतर त्यातील आवड निघून जाते. जर त्याची क्रिकेट खेळण्याची आवड अजूनही 100 टक्के असेल तर मला वाटते तो चांगला खेळाडू आहे आणि त्याने खेळले पाहिजे.’

‘पण मला त्याला एक विनंती करायची आहे. जेव्हाही तो खेळेल, त्याने आक्रमकपणे खेळले पाहिजे. काहीवेळेला एका ठराविक वेळेनंतर हलचाली मंद होतात. पण धोनीच्या बाबतीत त्याच्या हलचाली धीम्या झाल्याचे दिसले नाही. जर त्याने त्याचा नैसर्गिक खेळ अधिक केला, तर मला वाटते भारतासाठी ती चांगली गोष्ट आहे.’

सध्या धोनीने क्रिकेटमधून 2 महिने विश्रांती घेतली असून तो पुढील महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्ध असल्याचे त्याने बीसीसीआयला सांगितले आहे. भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल असलेला धोनी या रेजिंमेंटबरोबर पुढिल 2 महिने वेळ घालवणार असल्याचे म्हटले जात आहे.

त्याने घेतलेल्या विश्रांतीबद्दल अझरुद्दीन पुढे म्हणाला, ‘त्याने दोन महिने विश्रांती घेतली आहे. कदाचीत त्यानंतर तो काय करणार आहे, हे सांगेल. मला वाटते तो ज्यावेळी योग्य निर्णय घ्यायला हवा तेव्हा तो घेईल.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पंत, अय्यर, गिल सारख्या युवा खेळाडूंबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणाला…

कसोटी क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, जाणून घ्या अन्य भारतीय खेळाडूंची क्रमावारी

आर अश्विन पुन्हा चर्चेत, गोलंदाजी ऍक्शन बदलत केले फलंदाजाला बाद, पहा व्हिडिओ