मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी समोरच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून तो, त्याची पत्नी हसिन जहांने केलेल्या विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपामुळे चर्चेत आहे.

त्यातच या प्रकरणाल रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. आज पुन्हा एकदा शमीने बीसीसीआयची आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनची फसवणूक केली असल्याचा आरोप हसिनने केला आहे.

हा आरोप करताना तिने फेसबुकवर एक पोस्ट शेयर केली आहे. यात तिने म्हटले आहे की, शमीने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी खोटा जन्म दाखला बनवून घेतला होता.

त्याचा जन्म 1982 सालचा असून तो 1990 सालचा असल्याचा सर्वांना सांगत आहे. त्याने 22 वर्षींखालील संघात खेळता यावे म्हणून हा खोटा जन्म दाखला बनवला असल्याचे असेही तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.

त्याचबरोबर तिने त्याच्या ड्रायव्हींग लायसंन्सचा फोटोही शेयर केला आहे. ज्यात त्याची जन्मतारीख 8 मे 1982 अशी आहे.

परंतू काही वेळातच हसिनने तिची ही पोस्ट डिलीट केली.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे शमीचे जन्मसाल 1990 आहे. तसेच अाघाडीच्या क्रिकबझ आणि ईएसपीएन क्रिकईन्फो या दोन वेबसाईटवरही शमीची जन्मतारीख वेगवेगळी आहे.

शमी सध्या आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सकडून खेळत आहे, पण त्याला मागील दोन सामन्यात संधी मिळालेली नाही. त्याने भारताकडून 30 कसोटी, 50 वनडे आणि 7 टी 20 सेमने खेळले आहेत.

याआधीही शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप करताना फेसबुकवर ७ ते ८ पोस्ट लिहील्या आहेत. तिने शमीच्या फेसबुक आणि वाॅट्सअॅप चटींगचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने हसीन बरोबर २०१४ मध्ये लग्न केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळला नेहरा, आता होणार या राज्यात स्थायिक

मुंबईकर पृथ्वी शाॅ ठरला ११ मोसमातील अनेक खेळाडूंना सरस

IPL 2018: आव्हान राखण्यासाठी मुंबईला आजचा विजय महत्त्वाचा

Video: पहा सचिन तेंडूलकर, एमएस धोनीपोठीपाठ मुंबईकर पृथ्वी शॉचा हेलिकॉप्टर शॉट!

कॅप्टन म्हणून खेळला पहिलाच सामना, परंतू विक्रमांचा केला महा धमाका