कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मोहम्मद शमी ठरला केवळ ५ वा भारतीय वेगवान गोलंदाज

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव 243 धावांवर संपुष्टात आला असून त्यांनी पहिल्या डावातील 43 धावांच्या आघाडीसह भारतासमोर 287 धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताकडून या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने  सर्वाधिक 56 धावांत 6 विकेट घेतल्या. यामुळे त्याने यावर्षी कसोटीमध्ये 40 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे.  भारतीय वेगवान गोलंदाजाने एका वर्षात कसोटीमध्ये 40 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करण्याची केवळ 8 वी वेळ आहे. तसेच शमी हा भारताचा असा पराक्रम करणारा पाचवा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

याआधी कपिल देव यांनी 1979 आणि 1983 असे दोन वेळा, झहिर खानने 2002, 2007 आणि 2010 असे तीन वेळा, जवागल श्रीनाथ यांनी 1999 आणि इशांत शर्माने 2011 ला अशी कामगिरी केली आहे.

शमीने यावर्षी एकूण 11 सामन्यातील 21 डावात गोलंदाजी करताना 44 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अजून या वर्षातील भारताचा एक कसोटी सामना बाकी असून जर शमी या सामन्यात खेळला तर त्याला या वर्षातील विकेट्सचा आकडा वाढवता येणार आहे.

एका वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज-

75 विकेट्स – कपिल देव(1983)

74 विकेट्स –  कपिल देव(1979)

51 विकेट्स – झहिर खान (2002)

47 विकेट्स – झहिर खान (2010)

44 विकेट्स – जवागल श्रीनाथ (1999)

44 विकेट्स –  मोहम्मद शमी (2018) *

43 विकेट्स – इशांत शर्मा (2011)

41 विकेट्स – झहिर खान (2007)

महत्त्वाच्या बातम्या:

पंजाबच्या ‘ज्यूनियर युवराज’ने द्विशतक करत केली या मोसमातील सर्वोत्तम खेळी

आयपीएल लिलावाच्या एक दिवसाआधीच युवराज सिंगची दमदार अष्टपैलू कामगिरी

पर्थ कसोटी: दुसऱ्या डावात भारताची अडखळत सुरुवात, विजयासाठी भारतासमोर २८७ धावांचे आव्हान