शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप, शमीचे तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा फेसबूकवर आरोप

मुंबई : भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने हे आरोप करताना फेसबुकवर ७ ते ८ पोस्ट लिहील्या आहेत. 

मोहम्मद शमीच्या पत्नीचे नाव हसीनजहां असे असून तिने शमीच्या फेसबुक आणि वाॅट्सअॅप चटींगचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 

यात तिने काही महिलांचे सरळ मोबाईल क्रमांक देत तर काही तरुणींसोबतचे शमीचे फोटो शेअर करत पोस्ट लिहील्या आहेत. 

या सर्व पोस्ट मंगळवारी केल्या असून यातील बहुतेक पोस्ट बुधवारी डिलीट करण्यात आल्या आहेत. 

मोहम्मद शमी सध्या इंडीया ‘अ’ कडून खेळत असुन देवधर ट्राॅफीचे हे सामने धरमशाला येथे सुरू आहेत. त्याने भारताकडून ३० कसोटी, ५० वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. 

असे असले तरी काल मात्र  शमीच्या फेसबुक पेजवर मात्र एक लेख शेअर करण्यात आला असून ज्यात त्याने विराट कोहलीचे कर्णधार म्हणून कौतुक केलेले दिसते. 

२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने २०१४ मध्ये लग्न केले होते. २४ जानेवारी २०१८ रोजी तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.