मोहम्मद सिराज चमकला; टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या विजयाकडे वाटचाल

बेंगलोर | भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ यांच्यात एम चिन्नास्वामी मैदानावर शनिवारी (4 ऑगस्ट) पासून चार दिवसीय कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 99 धावा केल्या असुन अजून ते 239 धावांनी पिछाडीवर आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या या चारही विकेट भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने घेतल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 9 व्या षटकाच्या आतच सरेल एरवी, पीटर मलान आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार खाया झोंडोला बाद केले.

पीटर आणि झोंडो या दोघांनाही एकही धाव करता आली नाही. तर एरवीने 3 धावा केल्या. हे तिघेही बाद झाल्यावर झुबेर हमझा आणि सेनुरन मुथुसामीने दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळतना 86 धावांची भागिदारी रचली.

पण पुन्हा एकदा सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी करत ही जोडी तोडली. त्याने मुथुसामीला 41 धावांवर असताना बाद केले. झुबेर 99 चेंडूत 46 धावांवर नाबाद खेळत आहे.

तत्पूर्वी या सामन्यात तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात 2 बाद 411 धावांवर खेळत होता.

तर मयांक अगरवाल 220 धावांवर नाबाद खेळत होता. मात्र तिसऱ्या दिवशी अगरवालला एकही धाव जोडण्यात अपयश आले. त्याला बोरान हेन्ड्रिक्सने पायचीत बाद केले.

त्यानंतर भारताकडून हनुमा विहारी आणि श्रीकार भरत यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला पहिल्या डावात 584 चा टप्पा गाठून दिला. विहारीने 108 चेंडूत 54 धावांची खेळी केली, तर श्रीकारने 77 चेंडूत आक्रमक 64 धावा केल्या.

याबरोबरच भारताच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉने 196 चेंडूत 136 धावा केल्या होत्या. तर अन्य फलंदाजांपैकी रविकुमार समर्थ (37), कर्णधार श्रेयश अय्यर (24) आणि अक्षर पटेल (33) यांनी धावा केल्या.

भारताचा कर्णधार अय्यरने 8 बाद 584 धावसंख्येवर भारताचा पहिला डाव घोषित केला.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा केल्या होत्या. या डावातही सिराजने 56 धावात 5 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे भारताने पहिल्या डावात तब्बल 338 धावांची आघाडी मिळवली.

या सामन्याचा तिसरा दिवस कमी प्रकाशाच्या कारणाने दक्षिण आफ्रिकेचे दुसऱ्या डावात 40 षटके पूर्ण झाल्यानंतर थांबवण्यात आला.

संक्षिप्त धावफलक-

दक्षिण आफ्रिका पहिला डाव – सर्वबाद 246 धावा

भारत पहिला डाव – 8 बाद 584 धावा (घोषित)

दक्षिण आफ्रिका दुसरा डाव – 4 बाद 99 धावा

(झुबेर हमझा(46) आणि रुडी सेकंड(4) नाबाद खेळत आहेत.)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सहाव्या टी२० सामन्यात स्म्रीती मानधनाची सहावी धमाकेदार खेळी

ड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन

पुजारा टीम इंडियात हवा की नको? सेहवागने विचारला चाहत्यांना प्रश्न