टीम इंडीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया

1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतासमोर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कूकला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

पण काही दिवसांपूर्वीच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कूकला बाद करण्याचा मार्ग शोधून काढला आहे. याचा व्हिडिओही त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

#bowled #cook #indiaA🇮🇳 #bleedblue @indiancricketteam

A post shared by Mohammed Siraj (@mohammedsirajofficial) on

हा व्हिडिओ 16 – 19 जुलै दरम्यान भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघात झालेल्या सामन्यादरम्यानचा आहे. या सामन्यात कूकही खेळत होता.

त्याने पहिल्या डावात दिडशतकी खेळी करताना 180 धावा घेतल्या होत्या. मात्र त्याला हा फॉर्म दुसऱ्या डावात कायम राखता आला नाही. दुसऱ्या डावात त्याला सिराजने स्टंपच्या जवळ चेंडू टाकला. पण या चेंडूला फ्रंट फूटवर खेळताना कूकने चूक केली. ज्यामुळे कूक त्रिफळाचीत बाद झाला.

कूकने हा चेंडू लाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना बचावात्मक पवित्रा घेतला होता. पण सिराजने टाकलेला हा चेंडू पॅड आणि बॅटच्या मधून जात थेट मिडल स्टंपवर आदळला. हा चेंडू पाहून कूकला मात्र आश्चर्य वाटले.

परंतू या सामन्यात भारताला 253 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया

‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे

विराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे