आता मास्टर ब्लास्टर, किंग कोहली आणि हिटमॅनच्या नावावर आहे हा खास विक्रम

नॉटिंगहॅम | भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडेत भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली.

रोहितने या सामन्यात ११४ चेंडूत १३४ धावा करताना १५ चौकार आणि ४ षटकार मारले. याबरोबर त्याच्या नावावर एक खास विक्रमही झाला.

आपले वनडेतील १८वे शतक साजरे करणाऱ्या रोहितने यापैकी ११ शतके ही १२५ पेक्षा जास्त धावा करत केली आहेत.

म्हणजे केवळ ७ शतकांमध्ये त्याने १०० ते १२४मध्ये धावा केल्या आहेत.

वनडेत शतक साजरे करताना सर्वाधिक वेळा १२५ पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने हा पराक्रम १९वेळा केला आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने ३५ शतकांपैकी ११ शतकांमध्ये १२५ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितनेही १८ पैकी ११ शतकांत १२५पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश.. 

-रोनाल्डो खेळला रियाल मॅद्रिदसाठी; करार केला जुवेंटसबरोबर; फायदा होणार मॅंचेस्टर युनायटेडला

बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!