- Advertisement -

विराट कोहलीकडून महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी!

0 129

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त १५३ धावांची खेळी केली. याबरोबर त्याने कसोटी कर्णधार म्हणून ८व्यांदा १५० धावांची खेळी केली.

असे करताना त्याने महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार असताना ८वेळा १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे विराटने कसोटीत केलेल्या पहिल्या ११ शतकांमध्ये तो ९ वेळा १५० किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला तर पुढच्या १० शतकांत तो कधीही १५० च्या आधी बाद झाला नाही.

हे करताना विराटला मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडता आला नाही. सचिनने दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून १९९७मध्ये केपटाउन कसोटीत १६९ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्याची विराटला संधी होती परंतु तो १५३ धावांवर बाद झाल्यामुळे त्याचा हा विक्रम १६ धावांनी हुकला.

Comments
Loading...
%d bloggers like this: