विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण

सिडनी। भारताने आज (25 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आॅस्ट्रलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक करत महत्त्वाचा वाटा उचलला.

विराटने या सामन्यात 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

केला खास पराक्रम- 

विराटने या सामन्यात आपल्या टी२० कारकिर्दीतील १९वे अर्धशतक केले. ६५ सामन्यात विराटने ४९.२५च्या सरासरीने आजपर्यंत २१६७ धावा केल्या आहेत. त्यात ९० ही त्याची डावातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

यापुर्वी रोहित शर्मानेच केवळ आंतरराष्ट्रीय  टी२० सामन्यात १९ वेळा डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितने १५ अर्धशतके आणि ४ शतके केली आहेत.

अशे असले तरी विराटला या प्रकारात शतकी खेळी मात्र आजपर्यंत करता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

किंग कोहलीने मोडला ब्रेंडन मॅक्यूलमचा विक्रम, शोएब मलिकचाही विक्रम आहे धोक्यात

रोहित शर्माच्या ‘विराट’ विश्वविक्रमाशी कर्णधार कोहलीने केली बरोबरी

विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा आॅस्ट्रलियावर 6 विकेट्सने विजय

हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’