तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस

ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने  सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.

रोहितच्या या शतकी खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. जेव्हा त्याने चौथा षटकार मारला तेव्हा त्याचा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३४९वा षटकार ठरला.

याबरोबर भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पहिल्या स्थानावर विराजमान झाला.

यापुर्वी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने ५२३ सामन्यात ३४८ षटकार खेचले होते. तर रोहितने ३२० सामन्यातच हा कारनामा केला आहे.

भारतीय संघ ३ सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना हॅमिल्टनला १० फेब्रुवारी रोजी खेळणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू- 

४७६- ख्रिस गेल, सामने- ४४३

४७६- शाहिद आफ्रिदी, सामने- ५२४

३९८- ब्रेंडन मक्क्युलम, सामने- ४३२

३५२- सनथ जयसुर्या, सामने- ५८६

३४९- रोहित शर्मा, सामने- ३२०

३४८- एमएस धोनी, सामने- ५२३

महत्त्वाची बातमी-

जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती

ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस