रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे

गुवाहाटी। रविवारी (21 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शतके करत भारताला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला.

याबरोबरच रोहितने एक खास विक्रम रचताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रोहितने या सामन्यात 117 चेंडूत नाबाद 152 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 8 षटकार मारले आहेत.

यामुळे आता रोहितचे वनडे क्रिकेटमध्ये 194 षटकार झाले आहेत. तसेच तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने हा विक्रम करताना सौरव गांगुलीच्या 190 षटकारांना मागे टाकले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने आत्तापर्यंत 327 वनडे सामन्यात 217 षटकार मारले आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर 195 षटकारांसह सचिन तेंडुलकर आहे.

याबरोबरच सलामीवीर फलंदाज म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.

रोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेमध्ये 171 षटकार मारले आहेत. तसेच सचिनने सलामीवीर फलंदाज म्हणून 167 षटकार मारले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज-

217 – एमएस धोनी

195 – सचिन तेंडुलकर

194 – रोहित शर्मा

190 – सौरव गांगुली

155 – युवराज सिंग

महत्त्वाच्या बातम्या:

सायना नेहवालला डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद

हेटमेयरच्या शतकाच्या जोरावर विंडीजचे टीम इंडियासमोर विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान

२००वा वनडे सामना खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाच्या नावावर झाला नकोसा विक्रम

२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून