बहुचर्चित प्रीमियर लीगला पुन्हा एकदा सुरवात

काल इंटरनॅशनल ब्रेक नंतर परत एकदा चालू झालेल्या प्रीमियर लीग मध्ये मेनचेस्टर सिटी, लिवरपूल, मेनचेस्टर यूनाइटेड, स्टोक सिटी, लिस्टर सिटी, आणि गत वर्षीचे विजेते चेल्सी अश्या संघांचे सामने झाले. या सामन्यांमुळे वीकेंडची जबरदस्त मेजवानी फुटबॉल प्रेमींना अनुभवायला मिळाली.

पहिलीच मॅच पेप गॉरडिओलाच्या मेनचेस्टर सिटीची क्लोपच्या लिवरपूल बरोबर होती. पहिल्या हाफच्या २४ व्या मिनिटाला सिटीकडून अगुएरोने डी ब्रुइनेच्या असिस्ट वर गोल केला, अगुएरोचा हा १२४ वा गोल होता. ३७ व्या मिनिटाला लिवरपूलच्या मानेची किक सिटीचा गोलकीपर एडरसन याच्या तोंडावर लागली आणि त्याला त्वरित हॉस्पिटलला नेण्यात आले. मानला रेड कार्ड दिल्याने १० खेळाडूंच्या लिवरपूलचे सिटी समोर काहीच चालले नाही. सिटी कडून अगुएरोने १ तर जीससने आणि सनेने प्रत्येकी २-२ गोल केले.

यूनाइटेड विरुद्ध स्टोक सिटी २-२ ने ड्रॉ झाली. मँचेस्टर यूनाइटेड या मौसमामध्ये जबरदस्त खेळत होती पण काल त्यांचा खेळ हा त्यांच्या दर्जाचा नव्हता. लवकरच त्यांचा स्टार प्लेयर इब्राहिमोविच नविन १० नंबरची जर्सी घालून खेळणार आहे. काल यूनाइटेड कडून १ राश्फोर्ड आणि १ गोल लुकाकुने केला तर स्टोक सिटीकडून मोटिंगने २ गोल केले.

चेल्सीने लिस्टर सिटीवर २-१ असा, टॉटेनहमने रूनी च्या उपस्थितीत खेळणाऱ्या एव्हरटनवर ३-० असा, आर्सेनलने बॉर्नमाउथ वर ३-० असा विजय मिळवला.

नचिकेत धारणकर ( टीम महा स्पोर्ट्स )