मिताली राजने वनडेत केला सचिन एवढा मोठा विक्रम, आता दोन्ही विक्रम भारताच्या नावावर!

नागपूर | भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राजने आज वनडेत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या महिला खेळाडूचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

मिताली राजच्या नावावर आता १९२ वनडे सामने झाले असून त्यात तिने ४९.९६च्या सरासरीने ६२९५ धावा केल्या आहेत. त्यात तिने ६ शतके आणि ४९ अर्धशतके केली आहेत. 

परंतू या सामन्यात तिला ० धावेवर बाद व्हावे लागले. 

तिने चार्लेट एडवर्टचा १९१ सामन्यांचा विक्रम मोडला आहे. एडवर्टने इंग्लडकडून खेळताना १९१ सामन्यात ५९९२ धावा केल्या होत्या. त्यात तिने ९ शतके आणि ४६ अर्धशतके केली आहेत. तिने २०१६ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

वनडेत सर्वाधिक सामने खेळायचा विक्रम पुरुषांच्या क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने ४६३ सामने खेळले आहेत तसेच वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. 

यामुळे आता पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता भारतीय खेळाडूंच्या (सचिन तेंडूलकर आणि मिताली राज )नावावर झाला आहे. 

महिला वनडेत सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-
१९२- मिताली राज
१९१- चार्लेट एडवर्ट
१६७- झूलन गोस्वामी
१४४- अॅलेक्स ब्लकवेल