धोनीचा पुन्हा एकदा नवा विक्रम !

भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा खास विक्रम केला. परदेशी भूमीवर खेळताना सार्वधिक बळी यष्टीमागे घेण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर झाला आहे.

आज धोनी कारकिर्दीतील ७८वा टी२० सामना खेळत असून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून तब्बल ४७६ फलंदाजांला यष्टीमागे बाद केले आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरच्या नावावर होता. त्याने ४७५ फलंदाजांना यष्टींमागे बाद केले होते.

धोनीने आजपर्यत कारकिर्दीत कसोटीमध्ये २९४, वन-डेमध्ये ३८३ तर टी२०मध्ये ६३ अशा एकूण ७४० फलंदाजांना यष्टीमागे बाद केले आहे. त्यातील २६४ फलंदाजांना भारतात तर ४६७ फलंदाजांना परदेशात त्याने बाद केले आहे.

यष्टीरक्षक म्हणून परदेशी भूमीवर सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
४७६ एमएस धोनी
४७५ मार्क बाऊचर
४६०- ऍडम गिलख्रिस्ट
३६७- कुमार संगकारा