यावर्षी विराट कोहलीने खेळले आहेत तब्बल ३ हजार चेंडू

दिल्ली । काल विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील ६वे द्विशतक केले. हे करताना त्याने अनेक विक्रम तर केलेच पण भारताला भक्कम स्थितीत नेवून ठेवले

यावर्षी विराट कोहलीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये जबदस्त कामगिरी करताना चांगली सरासरी राखली आहे. भारतीय संघ यावर्षी ४७ सामने खेळला असून त्यात विराटने तब्बल ४६ सामन्यात भाग घेतला. धर्मशाळा कसोटीत दुखापतीमुळे तो भाग घेऊ शकला नाही.

या ४६ सामन्यात त्याने ५१ डावात फलंदाजी करताना ६९.२० च्या सरासरीने २७६८ धावा केल्या आहेत. त्यात ११ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. हे करताना विराटने तब्बल ३ हजार चेंडूंचा सामना केला आहे हे विशेष.

यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट एवढे चेंडू, धावा, शतके आणि सामने कोणताही खेळाडू खेळू शकला नाही.

यावर्षी सर्वाधिक चेंडू खेळणारे खेळाडू
३००० विराट कोहली
२८९० हाशिम अमला
२५९२ होप
२४७१ रूट
२४३७ चंडिमल
२४१८ पुजारा