टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत १० हजार चेंडू खेळणारे भारतीय फलंदाज

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात 27 धावांनी आघाडी घेतली आहे.

भारताने पहिल्या डावात सर्वबाद २७३ धावा केल्या. यातील १३२ धावा एकट्या चेतेश्वर पुजाराने केल्या. तळातील फलंदाजांना हाताशी धरुन पुजाराने जबरदस्त कामगिरी केली.

या सामन्यात जेव्हा पुजारा वैयक्तिक १२२वा चेंडू खेळला तेव्हा तो त्याचा कसोटी कारकिर्दीतील १० हजारावा चेंडू होता. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो ९वा तर जगातील ७१वा खेळाडू होता.

जागतीक क्रिकेटमध्ये केवळ ७५ खेळाडूंना कसोटीत १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त चेंडूंचा सामना करता आला आहे. या यादीत आता पुजारा हे नाव जोडले गेले आहे.

कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा पराक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने तब्बल ३११८४ चेंडू कसोटी कारकिर्दीत खेळले आहेत. जगातील अन्य कोणत्याही खेळाडूला ३० हजार किंवा त्यापेक्षा जास्त चेंडू खेळता आलेले नाहीत.

भारताकडून १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू खेळणारे फलंदाज

३११८४- राहुल द्रविड, सामने-१६४

२९४३७- सचिन तेंडूलकर, सामने- २००

१७७८५- व्हीव्हीएस लक्ष्मण, सामने- १३४

१५३२७- सुनिल गावसकर, सामने- १२५

१४०७०- सौरव गांगुली, सामने- ११३

११४५०- दिलीप वेंगसकर, सामने- ११६

१०४४१- विरेंद्र सेहवाग, सामने- १०४

१०३५६- विराट कोहली, सामने- ७०

१०१३५- चेतेश्वर पुजारा, सामने- ६१

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

२९ चेंडूत ० धावा…. रिषभ पंतचा अजब कारनामा

असे झाले कसोटीत ६ हजार धावा करणाऱ्या विराटचे हाॅटेलवर स्वागत

भारताचा डाव एकहाती सावरणाऱ्या पुजाराचे हे ५ खास पराक्रम पहाच

चौथी कसोटी: चेतेश्वर पुजाराचे शानदार शतक; टीम इंडियाने…

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?