शतक तर पुजाराने केले परंतु ही गोष्ट करुन कायम नाव इतिहासात कोरले

मेलबर्न। भारताचा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज(27 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. या दिवसाची सुरुवात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने चांगली केली होती.

आज पुजाराने त्याचे 17 वे कसोटी शतकही पूर्ण केले आहे. त्याने हे शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 280 चेंडूचा सामना केला आहे. त्यामुळे त्याचे हे शतक ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारतीय खेळाडूने केलेले तिसरे धीम्या गतीचे(चेंडूच्या तूलनेत) शतक ठरले आहे.

विषेश म्हणजे पुजाराचेही त्याच्या 17 कसोटी शतकांमधीलही हे सर्वात धीम्या गतीचे(चेंडूच्या तूलनेत) शतक आहे.

भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन भूमीत सर्वाधिक चेंडूचा सामना करत शतक करण्याचा विक्रम माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. त्यांनी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 1992 मध्ये 307 चेंडूमध्ये त्यांचे शतक पूर्ण केले होते.

त्यांच्या पाठोपाठ या यादीत माजी महान कर्णधार सुनील गावसकर आहेत. त्यांनी 1985 मध्ये अॅडलेडवर झालेल्या कसोटी सामन्यात 286 चेंडूत शतक पूर्ण केले होते.

आज पुजाराने 319 चेंडूत 106 धावा करताना 10 चौकर मारले आहेत. त्याला पॅट कमिन्सने त्रिफळातीत केले. पुजाराने विराटबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली आहे. विराट 82 धावा करुन बाद झाला.

ऑस्ट्रेलियन भूमीत सर्वाधिक चेंडूचा सामना करत शतक करणारे भारतीय क्रिकेटपटू – 

307 चेंडू – रवी शास्त्री, सिडनी क्रिकेट ग्राउंड, 1992

286 चेंडू – सुनील गावसकर, अॅडलेड ओव्हल, 1885

280 चेंडू – चेतेश्वर पुजारा, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, 2018

273 चेंडू – मोहिंदर अमरनाथ,सिडनी क्रिकेट ग्राउंड, 1986

महत्त्वाच्या बातम्या:

फक्त सचिनचेच नाही तर द्रविडचेही विक्रम मोडतोय विराट

ऑस्ट्रेलियन समालोचकांकडून आजचा हिरो ‘मयांक अगरवाल’चा मोठा अपमान

जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम