धावा करण्यात रोहित नापास, मात्र कॅच घेण्यात नाद करायचा नाही

बंगळुरू। काल आयपीएलमध्ये पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात बेंगलोरने 14 धावांनी विजय विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला एकही धाव करण्यात अपयश आले, परंतु त्याने क्षेत्ररक्षणात कामगिरी करताना एक खास विक्रम केला.

रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. काल त्याने बेंगलोरच्या क्विंटॉन डिकॉक आणि वॉशिंग्टन सुंदरचे झेल घेत आयपीएलमध्ये त्याचे 77 झेल पूर्ण केले आणि धडाकेबाज खेळाडू एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले.

डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत एकूण ७६ झेल घेतले आहेत. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना 89 झेलांसह अव्वल स्थानावर आहे.

रोहित शर्माने आयपीएलमध्ये यावर्षीच्या मोसमात दोन अर्धशतकांसह 8 सामन्यात 196 धावा केल्या आहेत. परंतु तो कर्णधार असलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला साजेशी कामगिरी अजून करता आलेली नाही. ते गुणतालिकेत 4 गुणांसह 6 व्या स्थानावर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
89- सुरेश रैना
77- रोहीत शर्मा
76- एबी डिव्हिलियर्स

महत्त्वाच्या बातम्या –

बेंगलोर शहरातील कॅफेनेही केले कोहलीच्या आरसीबीला ट्रोल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलली

आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

Video- चक्क स्टेडियमच्या बाजूला क्रेन उभे करून त्या फूटबाॅल वेड्याने घेतला सामन्याचा आनंद

अबब! विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम २०१८मध्ये तब्बल ३०० कोटी