दिनेश कार्तिकने संगकाराला टाकले मागे; धोनीचाही विक्रम आहे धोक्यात

कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(1 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने तीन झेल घेत एक खास विक्रम केला आहे. हा विक्रम करताना त्याने श्रीलंकेचा महान यष्टीरक्षक कुमार संगकारालाही मागे टाकले आहे.

टी20 क्रिकेट प्रकारात कार्तिकने यष्टीमागे 143 झेल पूर्ण केले आहे. याबरोबरच त्याने यष्टीरक्षक म्हणून संगकाराने घेतलेल्या 142 झेलांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. कार्तिकने 252 व्या टी20 सामन्यात हा पराक्रम केला आहे.

यष्टीरक्षक म्हणून टी20 मध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम भारताच्याच एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने टी20 मध्ये आत्तापर्यंत यष्टीमागे 151 झेल घेतले आहेत.

टी20 मध्ये सर्वाधिक झेल घेणारे यष्टीरक्षक-

151 – एमएस धोनी (297 सामने)

143 – दिनेश कार्तिक (252 सामने)

142 – कुमार संगकारा (264 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

‘पंड्या ब्रदर्स’ टी२० मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारी ठरली दुसरीच भावांची जोडी

‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकण्याची संधी

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर