आणि इंग्लंड या खास विक्रमाचा साक्षीदार झाला

सध्या इंग्लंड देशात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या देशाने आयसीसीच्या सर्वात जास्त स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळविला आहे. ३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ४ विश्वचषक आणि २००९चा टी२० विश्वचषक.

इंग्लंड संघ तसा तर कसोटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देणारा संघ म्हणून ओळखला जातो. म्हणून क्रिकेटचा शोध लावणारा हा देश एवढ्या वर्षांत जेमतेम ६९२ एकदिवसीय सामने खेळू शकला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हा देश तब्बल ९८३ कसोटी सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यांपेक्षा कसोटी सामने अधिक खेळणारा इंग्लंड हा जगातील एकमेव देश असेल.

हा नवीन विक्रम याच कसोटीला प्राधान्य देणाऱ्या देशात घडला आहे. इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके खेळाडूंनी बनवली आहेत. काल भारताच्या रोहित शर्माने जेव्हा शतकी खेळी केली ती या भूमीवरील १००० वी शतकी खेळी होती.

यांनतर नंबर लागतो तो ऑस्ट्रेलियाचा. या देशात ९९४ शतकी खेळी खेळाडूंनी केल्या आहेत तर भारतात हा आकडा आहे ७०१.

या देशांत झाल्या सर्वाधिक शतकी खेळी 
१००० इंग्लंड
९९४ ऑस्ट्रेलिया
७०१ भारत