शतक केले पुजारा-पंतने, विक्रम झाला टीम इंडियाच्या नावावर

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचा आज(4 जानेवारी) दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांचा घोषित केला आहे.

या डावात भारतीय संघाकडून तीन शतकी भागीदाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने एका डावात तीन शतकी भागीदाऱ्या करण्याची ही तिसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे तीनही वेळेस भारतीय संघाने हा पराक्रम सिडनी क्रिकेट ग्राउंडवर केला आहे.

पहिल्यांदा 2004 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 3 शतकी भागीदाऱ्या भारतीय संघाने केल्या होत्या. त्यानंतर 2008 मध्ये हा पराक्रम भारतीय संघाने दुसऱ्यांदा केला होता. त्यावेळीही पहिल्या डावात 3 शतकी भागीदाऱ्या भारताने केल्या होत्या.

सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सिडनी कसोटी सामन्यात भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा-मयंक अगरवाल, पुजारा-हनुमा विहारी आणि रविंद्र जडेजा-रिषभ पंत या जोड्यांनी शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.

चेतेश्वर पुजारा-अगरवालने दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची, पुजारा-विहारीने पाचव्या विकेटसाठी 101 धावांची तर जडेजा-पंतने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनी एवढ क्रिकेट खेळला, परंतु हा विक्रम कधी करताच आला नाही

का होतेय सध्या रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची तुलना

जे ना जमले कुणाला, ते जमले रिषभ पंतला