त्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू

सिडनी । ॲशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमध्ये सलग १५० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. २००६ ते २०१८ या काळात इंग्लंड जे १५० कसोटी सामने खेळले आहे त्या प्रत्येक सामन्यात कूकने भाग घेतला आहे.

या काळात तो कधीही कोणत्याही कारणामुळे संघाबाहेर राहिला नाही. कूकने १ मार्च २००६ रोजी कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो १५२ कसोटी सामने खेळला आहे. याच काळात इंग्लंड संघ १५३ कसोटी सामने खेळला आहे. पहिले काही सामने सोडले तर कूक हा सलग १५० कसोटी सामने संघाचा सदस्य राहिला आहे.

जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सलग सामने खेळण्याचा विक्रम हा अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून सलग १५३ कसोटी सामने खेळले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून जे १५६ कसोट सामने खेळले त्यातील तब्बल सलग १५३ सामने ते संघाचे नियमित सदस्य होते.

सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे खेळाडू
१५३ अॅलन बॉर्डर
१५०* ऍलिस्टर कूक
१०७ मार्क वॉ
१०६ सुनील गावसकर
१०१ ब्रेंडन मॅक्क्युलम
९८ एबी डिव्हिलिअर्स
९६ ऍडम गिलख्रिस्ट