टॉप ५: खेळाडू ज्यांनी केली आहेत सर्वाधिक द्विशतके

आजच्या झटपटीच्या काळात लोकांना सगळ्या गोष्टी झटपट लागतात त्याला क्रिकेट हा खेळही अपवाद राहीला नाही. क्रिकेटची सुरवात ही कसोटी या पाचदिवसीय प्रकाराने चालू झाली. कालांतराने यात बदल होऊन क्रिकेट हे एकदिवसीय आणि नंतर 20-20 या प्रकारातही खेळले जाऊ लागले.

टेस्ट क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला यशस्वी होण्यासाठी त्याला तांत्रिकदृष्ट्या खूप परिपाकव् असायला हवे. क्रिकेटच्या या प्रकारात दोन-दोन दिवस मैदानात गोलंदाजांसमोर धेर्याने व आत्मविश्वासाने उभे राहावे लागते. कधी धावा जमवायचा असतात तर कधी संघाची परिस्थिती पाहून फक्त किल्ला लढवायचा असतो. यात खेळात खेळाडूंची खरी कसोटी लागते.

काही दिग्गज खेळाडूंनी खूप लवकर कसोटी क्रिकेट खेळणे सोडून दिले तर काही खेळाडूंनी या परिस्थितीवर मात करून अफाट यश मिळवले. खूप साऱ्या फलंदाजानी खोऱ्याने धावा काढल्यात, काहींनी तर व्दिशतके बनवण्याचा विक्रमच प्रस्थापीत केला. आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच फलंदाजांना ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त द्विशतके झळकावली आहेत.

सर डॉन ब्रॅडमन –
जागतिक क्रिकेटमध्ये सगळ्यात यशस्वी आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणजे सर डॉन ब्रॅडमन. ऑस्ट्रेलियाच्या या महान खेळाडूने 52 टेस्ट सामन्यात 6996 धावा बनवल्या आहेत. त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरी ९९.९४ चा विश्वविक्रम आहे .त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 12 वेळा द्विशतके झळकावली आहेत. याशिवाय त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 29 शतके आणि 13 अर्धशतके ठोकली आहेत. .

कुमार संगाकारा-
श्रीलंकेचा सर्वोत्तम खेळाडू अशी ओळख निर्माण केलेला फलंदाज म्हणजे कुमार सांगाकारा. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात या खेळडूने आपले नाव चमकावले. संगाने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 11 वेळा द्विशतके ठोकली आहेत. कसोटीमधील आपल्या 15 वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत 12,400 धावा, 38 शतके आणि 52 अर्धशतके आपल्या नावावर केली आहेत. संगाकाराचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोर 319 धावा आहे.

ब्रायन लारा-
वेस्ट इंडिजसाठी 16 वर्ष क्रिकेट खेळणार्‍या ब्रायन लारा या महान खेळाडूच्या नावावर अशक्य असा वाटणारा 400 धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 9 वेळा द्विशतके ठोकली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये लाराच्या नावावर 11,953 धावा जमा आहेत, त्याने 34 शतके तर 48 अर्धशतके आपल्या नावावर नोंदविली आहेत.

वैली हैमंड-
इंग्लंडसाठी क्रिकेट खेळताना वैली हैमंडने 85 कसोटी सामन्यात 7 वेळा द्विशतके मारली आहेत. 336 धावांवर नाबाद हा हैमंडचा सर्वोच्च स्कोर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 22 शतके आणि 24 अर्धशतके केली आहेत.

महेला जयवर्धने-
श्रीलंकेचा दिग्गज आणि माहान खेळाडू महेला जयवर्धने याने आपल्या टेस्ट कारकिर्दीत 7 वेळा व्दिशतके मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने 149 टेस्ट सामन्यात 34 शतके आणि 50 अर्धशतकांच्या जोरावर 11,,814 धावा आपल्या नावावर केल्या आहेत .