जगातील सर्वच कर्णधारांसाठी हे वर्ष ठरले अतिशय खराब

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. भारत 346 धावांनी आघाडीवर आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या डावात ८२ तर दुसऱ्या डावात ० धावेवर बाद झाला.

कर्णधारांसाठी ठरले हे वर्ष अतिशय खराब- 

यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये १७ खेळाडूंनी विविध संघांचे कर्णधारपद भूषविले. यात १९ वेळा कर्णधार ० धावेवर बाद झाले. यात सर्वाधिक ४ वेळा फाफ डुप्लेसी तर ३ वेळा सुरंगा लकमल ० धावेवर बाद झाला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली १३ सामन्यात दोन वेळा ० धावेवर बाद झाला आहे.

तीन दिवस ठरले फारच वाईट- 

गेल्या तीन दिवसात तब्बल ५ वेळा कर्णधार ० धावेवर बाद झाले आहेत. यात सर्फराज अहमद आणि फाफ डुप्लेसी २ वेळा तर कर्णधार विराट कोहली १ वेळा शून्य धावेवर बाद झाले आहेत.

हे कर्णधार यावर्षी ० धावेवर बाद झाले नाहीत- 

यावर्षी १७ पैकी केवळ ६ कर्णधार ० धावेवर बाद झाले नाहीत. यात भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे, आयर्लंडचा वाॅटरफिल्ड, विंडीजचा क्रेग ब्रेथवेट, अफगाणिस्तानचा अझगर अफगाण, झिंबाब्वेचा हॅमिल्टन माझकादा, ऑस्टेलियाचा स्टीव स्मिथ आणि विंडीजचा जेसन होल्डर यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की

१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत

जसप्रीत बुमराह कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज