कोहलीसाठी आॅस्ट्रेलिया दौरा ठरणार या कारणामुळे विराट

ब्रिस्बेन | भारताच्या बहुचर्चित आॅस्ट्रेलिया दौऱ्याला आज सुरुवात होत आहे. द गाबा, ब्रिस्बने येथे होत असलेल्या टी२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील आजचा हा सामना भारतासाठी खूप अर्थांनी महत्त्वाचा आहे.

याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीची टीम इंडिया आॅस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

२०१८ वर्ष हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादीत षटकांचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी जबरदस्त ठरले. यावर्षी भारतीय संघाकडून या दोन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.

विराटने यावर्षी ३१ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७३.०६च्या सरासरीने २४११ धावा केल्या आहेत. यात १० शतकं आणि ७ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.

विराटने यापुर्वी २०१७मध्ये ४६ सामन्यात ६८.७३च्या सरासरीने २८१८ धावा केल्या होत्या. तर २०१६मध्ये ३७  सामन्यात ८६.५०च्या सरासरीने २५९५ धावा केल्या होत्या.

२०१४मध्ये विराटने ३८ सामन्यात ५५.७५च्या सरासरीने २२८६ धावा केल्या होत्या तर २०१२ला ४० सामन्यात ५३.३१च्या सरासरीने २१८६ धावा केल्या होत्या.

२०१५ हे वर्ष विराटसाठी गेल्या ६ वर्षांतील सर्वात खराब वर्ष ठरले होते. यावर्षी विराटने ३१ सामन्यात ३८.४४च्या सरासरीने १३०७ धावा केल्या होत्या.

२०१२ पासून २०१८ पर्यंत २०१५ वगळता विराटने सर्व वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

गेल्यावर्षी हुकलेला विक्रम यावर्षी करण्याची विराटला संधी- 

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्याचा विक्रम करण्याची विराटला मोठी संधी गेल्यावर्षी मिळाली होती. विराटने गेल्यावर्षी ४६ सामन्यात ६८.७३च्या सरासरीने २८१८ धावा केल्या होत्या. तर हा विक्रम नावावर असलेल्या कुमार संगकाराच्या नावावर ४८ सामन्यात २८६८ धावा होत्या. त्यामुळे विराटचा हा विक्रम केवळ ६८ धावांनी हुकला होता.

यावर्षी मात्र विराटला हा विक्रम करण्याची सुवर्णसंधी चालुन आली आहे. यावर्षी ३१ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७३.०६च्या सरासरीने २४११ धावा केल्या आहेत. विराटला हा विक्रम करण्यासाठी आता केवळ  ४५७ धावांची गरज आहे. विशेष म्हणजे विराटला यावर्षी ३ टी२० आणि ३ कसोटी सामने ३१ डिसेंबरपुर्वी खेळण्याची संधी मिळणार आहे.

यावर्षी भारतीय संघ एकूण ४७ सामने खेळला आहे. यातील ३१ सामन्यात विराट खेळला आहे. म्हणजे जर विराट यातील काही सामने खेळला असता तर हा विक्रम यापुर्वीच विराटच्या नावावर झाला असता.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू- 

२८८६- कुमार संगकारा- २०१४

२८३३- रिकी पाॅटिंग- २००५

२८१८- विराट कोहली- २०१७

२६९२- केन विलियसन- २०१५

२६८७- अॅंजेलो मेथ्थ्यू- २०१४

२४११- विराट कोहली- २०१७ (१८व्या स्थानी, ६ सामने बाकी)

महत्त्वाच्या बातम्या:

महिला टी२० विश्वचषकच्या अशा होणार सेमीफायनल

कसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी

मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल