ख्रिस गेलच्या मनात धडकी, एबी डिव्हिलियर्स मोडतोय हा विक्रम

बेंगलुरू | गुरुवारी राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात बेंगलोरने हैद्राबादवर १४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळालेल्या एबी डिव्हिलियर्सचा हा १८ वा पुरस्कार होता. याबरोबर त्याने सर्वाधिक सामनाविर पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

प्रथम फलंदाजी केलेल्या बेंगलोरने हैद्राबादसमोर २० षटकांत जिंकण्यासाठी २१९ धावांचे लक्ष ठेवले होते.

एबी डिव्हिलियर्स ६९, मोईन अली ६५, कोलिन डे ग्रॅडोहोम ४० आणि सर्फराज खान २२ यांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर बेंगलोरने २० षटकांत ६ विकेट गमावत २१८ धावा केल्या.

याला उत्तर देताना हैद्राबादने २० षटकांत ३ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. त्यात कर्णधार केन विलियमसन ८१ आणि मनिष पांडे ६२ यांनी चांगल्या धावा केल्या परंतु संघाला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरले.

या सामन्यात काल सर्वाधिक चर्चा जर कुणाची झाली असेल तर ती आहे एबी डी विलियर्सची. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशी दोन्ही आघाड्यांवर त्याने चमकदार कामगिरी केली.

त्याला १४० सामन्यात १८व्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.

काही दिवसांपुर्वी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याच्या १६ पुरस्कारांची बरोबरी युसुफ पठाणने केली होती.

या यादीत १०९ सामन्यात २० पुरस्कारांसह ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. त्याच्यात आणि डिव्हिलियर्समध्ये आता केवळ २ सामनावीर पुरस्कारांचे अंतर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनीवीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू- 

२०- ख्रिस गेल

१८- एबी डिव्हिलियर्स

१६- युसूफ पठाण, रोहित शर्मा

१५- डेविड वार्नर

१४- एमएस धोनी, सुरेश रैना

१३- गौतम गंभीर

१२- माईक हसी, अजिंक्य रहाणे

महत्त्वाच्या बातम्या-

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?

-आयपीएल इतिहासात हा ठरला सर्वात महागडा गोलंदाज

संघ पराभूत झाला म्हणून काय झाले, तो विक्रम तर भारतीय खेळाडूच्या नावावर झाला