तर धोनीच्या नावावर होणार अायपीएल इतिहासातील सर्वात मोठा विक्रम

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान चेन्नईचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाला पायाच्या पोटरीमध्ये क्रॅम्प आला होता. त्यामुळे त्याला या सामन्यात धावा करताना त्रास होत होता.त्यामुळे आता रैनाला पुढील दोन सामन्यांना म्हणजेच १५ एप्रिलला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या आणि २० एप्रिलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे.

तब्बल दोन वर्षांनी अायपीएलमध्ये खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला हा दुसरा मोठा धक्का आहे. यापुर्वी केदार जाधव अायपीएलमधून बाहेर पडला आहे. 

असे असले तरी चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन कूल एमएस धोनीला एक खास विक्रम करायची मोठी संधी आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू होण्यासाठी त्याला २ सामन्यांची गरज आहे. त्याने अायपीएलमध्ये १६१ सामने खेळले आहेत तर रैनाने १६३ सामने खेळले आहेत. 

रैना पुढील दोन सामने खेळणार नसल्यामूळे धोनी हा विक्रम आरामात आपल्या नावावर करू शकतो. अशीच संधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही मिळणार आहे. त्यानेही अायपीएलमध्ये १६१ सामने खेळले आहेत. त्यात १४ एप्रिल आणि १७ रोजी मुंबईचे सामने होणार आहेत. त्यामूळे रोहितला धोनीआधी ही संधी मिळणार आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू- 

१६३- सुरेश रैना

१६१- रोहित शर्मा

१६१- एमएस धोनी

१५४- दिनेश कार्तिक

१५१- युसूफ पठाण / राॅबीन उथप्पा