केवळ ७२ तासांत आयपीएल किंग सुरेश रैनाने तो विक्रम केला आपल्या नावे

पुणे। आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

हा सामना दुखापतीमूळे सुरेश रैना खेळणार नव्हता. परंतू दुखापतीमधून सावरल्यामूळे त्याने हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला. 

१७ एप्रिलला झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमधील विक्रमी १६३ वा सामना खेळत रैनाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. परंतू आज नाणेफेक होताच आयपीएलमधील १६४वा सामना रैनाच्या नावावर जमा झाला. 

याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीचाही हा १६३ वा सामना असल्यामूळे तो आता रोहित शर्माबरोबर दुसऱ्या स्थानी राहिल.