अबब! विराटने केलेला हा विक्रम पाहून गांगुलीही होईल थक्क!

डर्बन । कर्णधार विराट कोहलीने पहिल्या वनडे सामन्यात शतकी खेळी करताना अनेक विक्रम केले. त्यातील सर्वात खास विक्रम म्हणजे कर्णधार म्हणून केलेली शतकी खेळी.

विराटने वनडेतील ३३वे शतक करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि वनडेत कर्णधार म्हणून शतकी खेळी करणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला आहे.

असे करताना त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा एक खास विक्रम मोडला आहे. त्याने वनडेत भारताचे नेतृत्व करताना ११ शतके केली आहेत. त्यासाठी त्याने केवळ ४१ डाव घेतले आहेत.

माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र ११ शतके करताना १४५ डाव खेळले होते. आज ह्याच विक्रमाची विराटने बरोबरी करताना चक्क १०४ डाव सौरव गांगुलीपेक्षा कमी खेळले आहेत.