टॉप ३: एका डावात सर्वाधिक षटकार खेचणारे खेळाडू

मोहाली । भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्याचे हे वनडेत तिसरे द्विशतक होते. यापूर्वी रोहितने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरुद्ध द्विशतकी खेळी केली आहे.

असे करताना त्याने आज त्याने १२ षटकार खेचले. एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३मध्ये एकाच डावात १६ षटकार खेचले होते.

जागतिक वनडे क्रिकेटमध्ये एबी डिव्हिल्लर्सनेही एका डावात १६ षटकार खेचले आहेत. एबी डिव्हिल्लर्सने जेव्हा १६ षटकार खेचले होते तेव्हा त्याने ४४ चेंडूत १४९ धावा केल्या होत्या.

जागतिक क्रिकेटमध्ये एका डावात वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
१६- रोहित शर्मा
१६- एबी डिव्हिलिअर्स
१६- ख्रिस गेल

भारतीय खेळाडूंनी एका डावात वनडेत मारलेले षटकार
१६- रोहित शर्मा
१२- रोहित शर्मा
१०- एमएस धोनी
९- रोहित शर्मा