रोहित शर्मा सचिन-धोनीच्या पंक्तीत !

कानपुर । काल भारतीय संघाने ६ विकेट्सने न्युजीलॅंड संघाला पराभूत करत मालिका २-१ अशी जिंकली. यात रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आले. 

रोहितने या सामन्यात तुफान फटकेबाजी करताना १३८ चेंडूत १४५ धावा केल्या. यात त्याने १८ चौकार आणि २ षटकार खेचले. 

हे करताना त्याने एमएस धोनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि युवराज सिंगच्या यादीत स्थान मिळवले. रोहितने काल वनडेतील १५०वा षटकार मारला. 

भारताकडून यापूर्वी एमएस धोनी(२१३), मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(१९५), सौरव गांगुली(१९०) आणि युवराज सिंग(१५५) यांनी यापूर्वी १५० षटकार मारले आहे. 

रोहित शर्माने १७१ वनडे सामन्यात १६५ डावात फलंदाजी करताना १५० षटकार खेचले आहेत.