अखेर वनडेतील शहेनशहाला विराटने गाठलेच!

डर्बन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार कोहलीने शतकी खेळी तर मुंबईकर अजिंक्य रहाणेने ७९ धावांची खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.

या सामन्यात कर्णधार कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याचे हे वनडेतील ३३वे शतक होते.

हे करताना कर्णधार म्हणून विराटने एक खास विक्रम केलाय. तो विक्रम म्हणजे कर्णधार म्हणून विराटचा वनडेतील हा ३४ वा विजय ठरला आहे. विराटने ४४ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यात भारतीय संघ ९ पराभवांना सामोरे गेला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये रिकी पॉन्टिंग आणि क्लाईड लॉईड हे असे कर्णधार आहेत जे दोन वेळा ५० षटकांचा विश्वचषक जिंकले आहेत. विराटने ४४ सामन्यात ३४ विजय मिळवताना या दोघांच्या नावावर असलेल्या ह्याच विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराट कोहली, रिकी पॉन्टिंग आणि क्लाईड लॉईड यांनी कर्णधार म्हणून पहिल्या ४४ वनडेत बरोबर ३४ विजय मिळवले आहेत. हा विश्वविक्रम आहे.