असा पराक्रम करणारा एमएस धोनी दुसराच यष्टीरक्षक

मँचेस्टर। आज(9 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना होणार आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा कारकिर्दीतील 350 वा वनडे सामना आहे. त्यामुळे तो 350 वनडे सामने खेळणारा जगातील केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराने 360 वनडे सामने यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे.

विशेष म्हणजे संगकाराने त्याच्या कारकिर्दीत एकून 404 वनडे सामने खेळले आहेत. पण त्याने यातील 44 सामने केवळ फलंदाज म्हणून खेळले आहेत.

त्याचबरोबर धोनी 350 वनडे खेळणारा एकूण 10 वा क्रिकेटपटू तर भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने भारताकडून 350 पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत. सचिनने 463 वनडे सामने खेळले आहेत.

धोनीने 350 वनडे सामन्यांपैकी 3 सामने आशिया एकादश संघाकडून खेळले आहेत. तर त्याचा भारताकडून आजचा 347 वा वनडे सामने आहे.

#वनडेत सर्वाधिक सामने पुर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून खेळणारे खेळाडू-

360 – कुमार संगकारा

350 – एमएस धोनी

294 – मार्क बाऊचर

282 – एडम गिलख्रिस्ट

211- मोईन खान

#सर्वाधिक वनडे सामने खेळणारे क्रिकेटपटू – 

463 – सचिन तेंडुलकर

448 – माहेला जयवर्धने

445 – सनथ जयसुर्या

404 – कुमार संगकारा

398 – शाहिद आफ्रिदी

378 – इंझमाम उल हक

375 – रिकी पाँटींग

356 – वासिम आक्रम

350 – मुथय्या मुरलीधरन

350 – एमएस धोनी

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

हिटमॅन रोहित शर्माला हे तीन खास विक्रम करण्याची आज आहे सुवर्णसंधी

व्हिडिओ: कोहली म्हणतो, सामन्याआधी विलियम्सनला या गोष्टीची करुन देणार आठवण!

काय आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचा इतिहास?