गांगुली-तेंडुलकरनंतर विराट-रोहितची जोडीच ठरली बेस्ट!

पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना रविवारी(11 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या जोडीने  खास विक्रम केला आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताने शिखर धवनची विकेट पहिल्याच षटकात गमावली. पण त्यानंतर विराट आणि रोहितने भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली.

त्यामुळे विराट आणि रोहित यांची भारतासाठी वनडेत सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी दुसऱ्या क्रमांकाची जोडी ठरली आहे.

त्यांनी वनडेत एकत्र खेळताना भागीदारीत आत्तापर्यंत 65.72 च्या सरासरीने 77 डावात 4732 धावा केल्या आहेत. त्यांनी हा विक्रम करताना रोहित आणि शिखरने भागीदारीत केलेल्या 4728 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

भारताकडून वनडेत सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या नावावर आहे. या दोघांनी भागीदारीत 176 डावात 47.55 च्या सरासरीने 8227 धावा केल्या आहेत.

याबरोबरच वनडेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याऱ्या भारतीय जोड्यांमध्येही विराट आणि रोहितची जोडी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. त्यांनी रविवारी 32 व्यांदा 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली.

हा पराक्रम करताना त्यांनी विरेंद्र सेहवाग आणि तेंडुलकर यांच्या जोडीला मागे टाकले. या जोडीने 31 वेळा वनडेत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. तसेच या यादीतही अव्वल क्रमांकावर गांगुली आणि तेंडुलकरची जोडी आहे. त्यांनी 55 वेळा असा कारनामा केला आहे.

#भारतासाठी वनडेमध्ये भागीदारीत सर्वाधिक धावा करणारी जोडी – 

8227 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली

4732 – रोहित शर्मा – विराट कोहली

4728 –  रोहित शर्मा – शिखर धवन

#भारतासाठी वनडेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी जोडी – 

55 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली

32 – रोहित शर्मा – विराट कोहली

31 – सचिन तेंडुलकर- विरेंद्र सेहवाग

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू

अफगाणिस्तान बोर्डाने मोहम्मद शहजादला सुनावली ही मोठी शिक्षा…