रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम

मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 89 षटकात 2 बाद 215 धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजारा 68 धावांवर आणि विराट कोहली 47 धावांवर नाबाद खेळत आहेत.

याबरोबरच भारताचा कर्णधार कोहलीने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2700 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रिकी पॉटिंग(2657), केन विलियमसन(2692) आणि अँजेलो मॅथ्यूज(2687) यांच्या धावांना मागे टाकत चौथा क्रमांक मिळवला आहे.

विशेष म्हणजे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मागीलवर्षी विराटने केलेले 2818 धावा आहेत. तसेच अव्वल क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा असून त्याने 2014 मध्ये 2868 धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ पॉटिंगचे 2005 मध्ये केलेल्या 2833 धावा आहेत.

विराटने जर या सामन्यात आणखी 169 धावा केल्या तर त्याला या यादीत संगकाराला मागे टाकत अव्वल क्रमांकावर येण्याची संधी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

2868 धावा – कुमार संगकारा (2014)

2833 धावा – रिकी पॉटिंग (2005)

2818 धावा – विराट कोहली (2017)

2700 धावा* – विराट कोहली (2018)

2692 धावा – केन विलियमसन (2015)

2687 धावा – अँजेलो मॅथ्यूज (2014)

2657 धावा रिकी पॉटिंग (2003)

महत्त्वाच्या बातम्या:

८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली

जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम

मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज