द वाॅल द्रविडपेक्षाही कोहलीची वाॅल होणार विराट, जाणून घ्या काय आहे कारण

पर्थ | वेस्टर्न क्रिकेट असोशियशन क्रिकेट स्टेडियम अर्थात वाका, पर्थ येथे उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला असून ते १-०ने आघाडीवर आहे.

याच वाकावर आता कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात जर विराटने ११४ धावा केल्या तर आॅस्ट्रेलियात भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी जाईल.

विराटने आॅस्ट्रेलियात ९ कसोटी सामन्यात ५७.१६च्या सरासरीने १०२९ धावा केल्या आहेत तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या राहुल द्रविड १५ सामन्यात ४३.९६च्या सरासरीने ११४३ धावा केल्या आहेत. विराटला हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.

भारताकडून आॅस्ट्रेलियात कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज- 

१८०९- सचिन  तेंडूलकर, सामने- २०

१२३६- व्हीव्हीएस लक्ष्मण, सामने-१५

११४३- राहुल द्रविड, सामने- १५

१०२९- विराट कोहली, सामने- ९

९४८- विरेंद्र सेहवाग, सामने-१०

महत्त्वाच्या बातम्या:

गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या खेळाडूचा आयपीएलला बाय बाय

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारणही आहे तसचं काहीस वेगळं

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप