यावर्षी विराटकडून होणार मोठी कामगिरी

कानपुर । विराट कोहली या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करू शकतो. विराटला यासाठी केवळ ९ धावांची गरज आहे.

विराटने यावर्षी ३९ सामन्यात ४३ डावात फलंदाजी करताना ५८.५५च्या सरासरीने १९९१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानावर हाशिम अमला असून त्याने ३४ सामन्यात १९८८ धावा केल्या आहेत तर जो रूट ३० सामन्यात १८५५ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

विराटने २०१६ या वर्षातही २००० धावांचा टप्पा ओलांडला होता. तेव्हा त्याने ३७ सामन्यात २५९५ धावा केल्या होत्या. त्यात ७ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश होता.

विराटने यापूर्वी २०१४ आणि २०१६ यावर्षी २००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला आहे.

२०१७ मध्ये सार्वधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे खेळाडू
१९९१ विराट कोहली
१९८८ हाशिम अमला
१८५५ जो रूट