भारतीय संघात नाही मिळाले स्थान पण आयपीएलमध्ये घालतोय धुमाकूळ!

मुंबई | मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज प्रथमच आयपीएलमध्ये समोरासमोर आले. या सामन्यात मुंबईने २० षटकांत ४ बाद १८१ धावा करत कोलकातासमोर १८२ धावांचे लक्ष ठेवले आहे.

आज मुंबईकडून खेळताना सुर्याकुमार यादवने ३९ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात त्याने २ षटकार आणि ७ चौकारांतची बरसात केली.

Read- आयपीएल सरासरीमध्ये कॅप्टन कुल धोनी विराट-सचिनच्या पुढे

याबरोबर त्याने आयपीएलमधील १००७ धावांचा टप्पा पार केला. आयपीएलमध्ये अनकॅपड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेला खेळाडू ) प्लेअरने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

आयपीएलमध्ये १ हजार धावा करणारा तो केवळ दुसरा अनकॅपड प्लेअर आहे. यापुर्वी मनन व्होराने आयपीएलमध्ये १००४ धावा केल्या आहेत.

सुर्याकुमार यापुर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे. अाणि आज विशेष म्हणजे त्याने हा पराक्रम देखील आपल्या जुन्याच संघाविरुद्ध केला आहे.

Read- ही आहे आयपीएल २०१८मधील सर्वात गमतीशिर आकडेवारी!

मुंबई रणजी संघाकडून प्रथम श्रेणीचे ६७ सामने खेळणाऱ्या २७ वर्षीय गुणी खेळाडूला अजूनतरी भारतीय संघात संधी मिळाली नाही. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४३.७०च्या सरासरीने ४५४५ धावा केल्या आहेत.