रैना झाला ८ धावांवर बाद आणि आयपीएलमधील खास विक्रमावर झाले कोहलीचे शिक्कामोर्तब

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स समोर विजयासाठी 20 षटकात 150 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना 8 धावांवर बाद झाला. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर पुढील एकवर्षासाठी तरी कायम राहणार आहे.

आयपीएलमध्ये विराटने आत्तापर्यंत 177 सामन्यात 37.84 च्या सरासरीने 5412 धावा केल्या आहेत. तर रैनाने 193 सामन्यात 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात रैनाला विराटला मागे टाकण्याची संधी होती पण रैनाला राहुल चहरने पायचीत बाद केल्याने रैनाची ही संधी हुकली.

त्यामुळे आता आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट अव्वल क्रमांकावर तर रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

5412 – विराट कोहली

5368 – सुरेश रैना

4898 – रोहित शर्मा

4706 – डेव्हिड वॉर्नर

4579 – शिखर धवन

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून पोलार्डने रागाने हवेत फेकली बॅट, पहा व्हिडिओ

चक्क चाहत्याने मुंबई इंडियन्सला सुचवली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकण्याची योजना

आयपीएल २०१९: अंतिम सामन्यासाठी मुंबई-चेन्नईचे असे आहेत ११ जणांचे संघ