बापरे! एकाच ओव्हरमध्ये फलंदाजांनी कुटल्या चक्क ४३ धावा

न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी मिळून एकाच षटकात ४३ धावा करण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडच्या देशांतर्गत वनडे मालिकेतील नाॅर्थन नाईट्स विरुद्ध सेंट्रल ड्रिस्ट्रिक्ट सामन्यात हा पराक्रम झाला.

या सामन्यात नाणेफेक जिंकत सेंट्रल ड्रिस्ट्रिक्टने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. परंतु हा निर्णय़ त्यांच्या चांगलाच अंगलट आला.

जो कार्टर आणि ब्रेट हॅम्टन या नाॅर्थन नाईट्सच्या फलंदाजांनी अशी काही फलंदाजी केली की संघाने ५० षटकांत ७ बाद ३१३चा टप्पा पार केला.

यातील एका षटकात तर चक्क ४३ धावा चोपण्यात आल्या. जन्माने दक्षिण आफ्रिकेचा असलेला आणि सेंट्रल ड्रिस्ट्रिक्टचा विलेम लुडिक हा गोलंदाज याचा बळी ठरला.

तो जेव्हा त्याची शेवटचे षटकं टाकत होता त्यापुर्वी त्याने ९ षटकांत १ बाद ४२ धावा दिल्या होत्या. परंतु शेवटच्या षटकांत ४३ धावा दिल्यामुळे त्याने १० षटकांत तब्बल ८५ धावा दिल्या.

जो कार्टर आणि ब्रेट हॅम्टन दोघांनी या षटकांत ६ षटकार, एक चौकार आणि एक धाव पळून काढली. शिवाय गोलंदाजाने यातील दोन चेंडू नो-बाॅल टाकले.

महत्त्वाच्या बातम्या:

म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल