संघात एकवेळ स्थान न मिळालेल्या जडेजाने संघासाठी वाचवल्या ४१ धावा

मँचेस्टर। 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला उपांत्य सामना आज राखीव दिवशी सुरु झाला आहे.आज या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 239 धावा केल्या आहेत.

याबरोबरच भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने खास विक्रम केला आहे. तो या विश्वचषकात संघासाठी क्षेत्ररक्षण करताना सर्वाधिक धावा वाचवणारा खेळाडू ठरला आहे.

त्याने या विश्वचषकात आत्तापर्यंत केवळ 2 सामने खेळताना तब्बल 41 धावा वाचवल्या आहेत. या यादीत त्याच्या पाठोपाठ मार्टिन गप्टील आहे. गप्टीलने 9 सामन्यात 34 धावा वाचवल्या आहेत.

जडेजाने न्यूझीलंड विरुद्ध 2 झेल आणि एक धावबाद केले आहे. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना 1 विकेटही घेतली आहे.

हा सामना काल पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला होता. पण आज याच धावसंख्येवरुन हा सामना पुढे सुरु झाला होता.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला आहे. पण भारताने रोहित शर्मा, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीची विकेट चार षटकांच्या आतच गमावली आहे. त्यामुळे भारतीय संघाची आवस्था 3 बाद 5 धावा अशी झाली आहे.

2019 विश्वचषकात सर्वाधिक धावा क्षेत्ररक्षण करताना संघासाठी वाचवणारे खेळाडू-

41 – रविंद्र जडेजा (2 सामने)

34 – मार्टीन गप्टील (9 सामने)

32 – ग्लेन मॅक्सवेल मॅक्सवेल (9 सामने)

27 – मार्कस स्टाॅईनिस (7 सामने)

27 –  शेल्डन काट्रेल (9 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

लिटिल मास्टर गावसकरांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!

कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूने केले होते मराठी चित्रपटात काम

विराट कोहली करतोय जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे अनुकरण, पहा व्हिडिओ