गोलंदाजांसाठी ही आयपीएल या कारणामुळे ठरतेय खराब

मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ५ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार आहेत.

या स्पर्धेचा शेवटचा सामना २७ मे रोजी मुंबईला खेळवला जाणार आहे. २०१८ची आयपीएल ही खऱ्या अर्थाने गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली होती. केवळ ५१ सामन्यात यावेळी ७३६ षटकार खेचले गेले आहेत.

यापुर्वी कधीही एवढे जास्त षटकार एकाच हंगामात मारले गेले नाहीत. सरासरी एका सामन्यात ७.२८ षटकार या मोसमात मारले गेले आहेत. यापुर्वी कधीही ही सरासरी ६च्या पुढे गेली नाही.

२०१२ साली आयपीएलमध्ये १४८ डावात ७३४ षटकार खेचले गेले होते. तर २०१४ला १२० डावात ७१४ षटकार मारले गेले होते.

यावर्षी १०१ डावातच ७३६षटकारांचा टप्पा पार केला गेला आहे.

७३६ पैकी ३२ षटकार एकट्या केएल राहुलने, ३१ षटकार रिषभ पंतने तर ३० षटकार एबी डिव्हिलियर्सने मारले आहेत.

असे असतानाही काही गोलंदाज असेही आहेत ज्यांनी सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले आहेत. उमेश यादवने १३६, राशिद खान १२८ तर जसप्रित बुमराहने १२५ निर्धाव चेंडू टाकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तर कोलकाता जाणार आयपीएलमधून बाहेर

ख्रिस गेलच्या मनात धडकी, एबी डिव्हिलियर्स मोडतोय हा विक्रम

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?