आणि शाहिद आफ्रिदीचा विक्रम थोडक्यात वाचला

मोहाली । श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. त्याचे हे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार खेचले.

त्याने २०१७या वर्षात २० वनडेत फलंदाजी करताना ७५.६४च्या सरासरीने १२८६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४५ षटकारांचा आणि ११६ चौकरांचा समावेश आहे.

एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे. त्याने २०१५मध्ये २० सामन्यात ५८ षटकार मारले होते.

या यादीत दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदी असून त्याने २००२मध्ये त्याने ३६ डावात ४८ षटकार खेचले होते. रोहितला हा विक्रम मोडण्याची संधी होती.

यावर्षी रोहित वनडेत शेवटचा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात आफ्रिदीचा हा विक्रम मोडण्याची रोहितला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

एका वर्षात वनडेत सर्वाधिक षटकार खेचणारे खेळाडू
५८- एबी डिव्हिलिअर्स (२०१५, १८ डावात)
४८- शाहिद आफ्रिदी (२००२, ३६ डावात )
४५- रोहित शर्मा (२०१७, २० डावात)
४२- शेण वॉटसन (२०११, २२ डावात)
४२- मार्टिन गप्टिल (२०१५, ३२ डावात)