IPL 2018- षटकार किंग्जच्या यादीत आता या नविन बादशहाचा प्रवेश!

कोलकाता नाईट रायडर्सने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणाने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

जरी पराभव झाला तरी काल राॅयल चॅलेंजर बेंगलोरकडून एबी डी विलीयर्सने चांगलीच फटकेबाजी केली. त्याने २३ चेंडूत ४४ धावा करताना तब्बल १ चौकार आणि ५ षटकार खेचले. 

याबरोबर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी आला. त्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये १३० सामन्यात १६१ षटकार खेचले आहेत. तो ज्या संघात खेळतो त्या संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये १६१ षटकार खेचले आहेत परंतू त्याने एबी डी विलीयर्सपेक्षा २० सामने यासाठी जास्त खेळले आहेत. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारे खेळाडू- 

२६५- ख्रिस गेल, सामने- १०१
१७३- रोहित शर्मा, सामने- १६०
१७३- सुरेश रैना, सामने- १६२
१६१- एबी डी विलीयर्स, सामने- १३०
१६१- विराट कोहली, सामने- १५०