धोनी जादू! हातात बॅटही न घेतलेल्या धोनीच्या नावावर तिसऱ्या टी२० सामन्यात विक्रमांचा विक्रम

हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही तीन सामन्यांची टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. यामुळे आजचा सामना जिंकून मालिका २-१ अशी खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.

आज जेव्हा नाणेफेक झाली तेव्हाच धोनीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच यापुर्वी आशियातील केवळ दोनच खेळाडूंनी ३०० टी-ट्वेंटी सामने होते.

यात शोएब मलिकच्या ३३५ तर सोहेल तन्वीरच्या ३०८ सामन्यांचा समावेश आहे.

धोनीने कारकिर्दीत २९९ टी-ट्वेंटी सामने खेळले असून त्यात ३८.५७च्या सरासरीने ६१३४ धावा केल्या आहेत. या २९९पैकी तब्बल २५५ सामने तो कर्णधार म्हणून खेळला आहे.

२९९ पैकी १७५ सामने धोनी आयपीएल तर ९५ सामने भारताकडून खेळला आहे.

सर्वाधिक ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळणारे आशियाई खेळाडू- 

३३५- शोएब मलिक

३०८- सोहेल तन्वीर

३००- एमएस धोनी

२९८- रोहित शर्मा

२९६- सुरेश रैना

२९५- शाहिद आफ्रिदी