- Advertisement -

भारतात टी२०मध्ये ५०० धावा करणारा दुसरा खेळाडू बनायची धोनीला संधी !

0 403

राजकोट । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला उद्याच्या सामन्यात एक मोठा विक्रम करता येणार आहे. जर धोनीने उद्याच्या सामन्यात ३१ धावा केल्या तर तो भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५०० धावा करणारा केवळ दुसरा खेळाडू बनणार आहे.

सध्या धोनीच्या नावावर २६ सामन्यात ३९.०८ च्या सरासरीने ४६९ धावा आहेत. यात धोनीचे केवळ एकच अर्धशतक असून त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला हे एकच टी२० अर्धशतक केले आहे.

भारतात टी२० सामन्यात सर्वाधिक धावा या कर्णधार विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने २० सामन्यात ४१.७३ च्या सरासरीने ६२६ धावा केल्या आहेत.

या यादीत तिसऱ्या स्थानावर युवराज सिंग(४३७), चौथ्या स्थानावर सुरेश रैना(४१८) आणि पाचव्या स्थानावर जो रूट (३७५) धावा आहेत.

भारतात २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा टी२० सामन्यात करणाऱ्या खेळाडूंमध्ये जो रूटची सरासरी हे सर्वोत्तम आहे. त्याने केवळ १० सामन्यात ५३.५७च्या सरासरीने ३७५ धावा केल्या आहेत.

उद्याचा सामना येथील सौराष्ट्र क्रिकेट मैदानावर संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. अपेक्षा आहेत की या सामन्यात एमएस धोनीला फलंदाजीची संधी मिळेल आणि तो हा विक्रम करेल.

Comments
Loading...
%d bloggers like this: