भारतीय संघाचा टी२० क्रिकेटमधील हा अनोखा विक्रम माहीत आहे का?

कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून एक खास विक्रम रचला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.

कालच्या विजयाबरोबरच भारताने आंतराष्ट्रीय टी २० मध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वेळा विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. भारताने आजपर्यंत श्रीलंकेला ११ वेळा पराभूत केले आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून भारताने आंतराष्ट्रीय टी २० मध्ये ऑस्ट्रेलियाला १० वेळा पराभूत केले आहे. त्याच्या खालोखाल भारताने ८ वेळा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला आहे.

श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर विजय मिळवला होता पण त्यानंतर भारताने पुनरागमन करत दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशला आणि नंतर श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला.

आंतराष्ट्रीय टी २० मध्ये भारताकडून सर्वाधिक वेळा पराभूत होणारे प्रतिस्पर्धी संघ:

११ – श्रीलंका
१० – ऑस्ट्रेलिया
०८ – दक्षिण आफ्रिका
०६ – बांग्लादेश आणि पाकिस्तान
०५ – इंग्लंड आणि झिम्बाब्वे